Wednesday, February 12, 2025

ahmednagar crime news :कर्जत तालुक्यातील दोघे तडीपार

कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी कर्जत पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात दोघांच्या तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. अमोल ताराचंद पवार, रा. बारडगाव दगडी, व महेंद्र गंडीश्या काळे, रा. धालवडी, या दोघांना एक वर्षासाठी नगर व पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे आदेश पारित केले आहेत.

तसेच कर्जत पोलीस ठाण्यात नव्याने आणखी हद्दपारचे 6 प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर केलेले आहेत. सध्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करु शकणार्‍या इसमांना तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात यावे, यासाठी 50 हून अधिक प्रस्ताव कर्जत पोलीस ठाण्याकडून दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles