गेल्या नऊ दिवसापासून धनगर आरक्षण प्रश्नावर आम्ही उपोषण करत आहोत सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करीत दोन आंदोलकांनी गुरुवारी दुपारी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाले होते. त्यांचा काल रात्री रात्रभर शोध सुरू होता. अखेर सकाळी एका मच्छीमाराने दिलेल्या माहितीनुसार हे दोन आंदोलन आढळून आले आहेत. कोळसे व सोरमारे पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे.
आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी ही सूचना स्थानिक मच्छीमारांना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असताना आणि प्रत्यक्षदर्शीच्या मासेमारी करणाऱ्याच्या सांगण्यानुसार दोघे चालत-चालत येऊन चप्पुवर झोपले होते.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.