Wednesday, April 30, 2025

या गावाने केली कमाल! राज्यात दोन उपमुख्यमंत्री, मग गावात दोन उपसरपंच का नाही?

राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. दोन उपमुख्यमंत्रीचा हा पॅटर्न राज्यात आघाडी आणि युती सरकार आल्यापासून सुरु झाला. संविधानात कुठेही दोन उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख नाही. मग राज्यातील हा पॅटर्न गावात सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावाने हा प्रयोग राबवला. राज्यात दोन उपमुख्यमंत्री नंतर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये दोन उप सरपंचपद आंबेगाव तालुक्यात झाले. ग्रामपंचायतीने आता दोन उपसरपंचांना अधिकृतरित्या मान्यता देण्यासंदर्भातील निवेदनही जिल्हाधिकारींना दिले आहे.
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीनेने दोन उपसरंपच करण्याचा ठराव करून घेतला. त्यानंतर राज्यात जसे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याप्रमाणे गावात एक सरपंच आणि दोन उपसरपंच म्हणून अधिकृतरित्या मान्यता देण्याचे निवेदन जिल्हाधिकारींना दिले आहे. गावात उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कौसल्या संतोष भोजने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर लगेचच सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या बैठक झाली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करत दुसरे उपसरपंचपदी सचिन बाप्पू टाव्हरे यांची निवड केली

जारकरवाडी ग्रामपंचायतमध्ये दोन उपसरपंच निवडले गेल्यानंतर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. यासंदर्भात निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने ठराव करुन २३/११/२०२३ रोजी ग्रामपंचायत जारकरवाडीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीबाबत ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम 2c(t) प्रमाणे नियम १९६५ मधील तरतुदीनुसार सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर याच्या सभा अध्यक्षाच्या खाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात येत आहे. तरी मी ST प्रवर्गातील सरपंचपदी असल्याने आणि आमच्या गावच्या लोकसंख्येच्या आणि गावच्या विस्ताराचा विचार करता मला ग्रामपंचायत जारकरवाडीसाठी दोन उपसरपंचाची नेमणूक करण्याची गरज वाटत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles