राज्यात आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असे दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाला देखील दोन उपसरपंच असावेत अशी मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावाला दोन उपसरपंच असावेत, अशी मागणी वैजापूर तालुक्यातील मनूर गावातील माजी सरपंचांकडून करण्यात आली आहे.
राजीव सुदामराव साळुंके असं या माजी सरपंचांचं नाव आहे. ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच असावेत अशी मागणी साळुंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.