व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती गर्दीच्या रस्त्यावर बाईक स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. स्टंटसाठी हा व्यक्ती त्याच्या बाईकचं पुढचं चाक हवेत उंचावताच त्याचा तोल बिघडतो. व्हिडिओ पाहून आपण अंदाज लावू शकतो, की तो तरुण ज्या पद्धतीने पडला, त्यावरून त्याला गंभीर दुखापत झाली असावी. याठिकाणी त्याने स्वत:चं नुकसान तर केलंच शिवाय समोरून येणारा दुचाकीस्वारही त्याच्या गाडीच्या धडकेत खाली पडला .
या विचित्र अपघाताचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर kannu_40p नावाच्या अकाऊंटवर शेअर केला गेला आहे.