लावणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन नृत्य म्हणून लावणी सर्वत्र ओळखली जाते. अनेक लावणी कलाकार सुरेख लावणी सादर करत असतात. सोशल मीडियावर लावणी सादर करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. सर्वच वयोगटातील कलाकार लावणीवर सुंदर व्हिडीओ बनवित असातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या दोघींची लावणी पाहून तुम्हाला अस्सल लावणी कलावंत आठवतील. दोघीही तरुणी एकमेकींना टक्कर देत लावणी सादर करत आहे. काही लोकांना ही लावणी पाहून अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर मोठ्या अक्षरात लिहिलेय,”याला म्हणतात तोडा” लावणी तोडा हा एक सुंदर प्रकार आहे.
लावणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान आहे. अनेक तरुण मंडळी उत्साहाने लावणी सादर करताना दिसतात. पूर्वी फक्त स्त्रिया लावणी सादर करायच्या आता त्यात पुरुषांची सुद्धा संख्या वाढताना दिसत आहे.
Video : तरुणींन सादर केली सुरेख लावणी, या दोघींची लावणी पाहून थक्क व्हाल….
- Advertisement -