बच्चू कडूंनी आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे. बच्चू कडू माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या सरकारबरोबर त्यांचं प्रहार युतीत आहे. त्यांच्याबरोबर आमचे अपक्ष राजेंद्र यड्रावकर मंत्री होते, त्यांनाही न्याय मिळालेला नाही. अन्यही अनेकांना न्याय मिळालेला नाही. आमच्या ४० आमदारांपैकीही इच्छुकांना न्याय मिळालेला नाही. बच्चू कडूंचा गैरसमज होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील”, असं उदय सामंत म्हणाले
उदय सामंत सध्या विदर्भात असून त्यांना माध्यम प्रतिनिधींनी मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप व बच्चू कडूंच्या नाराजीबाबत प्रश्न विचारले. यावेळी उदय सामंत यांनी सरकारमधील सहभागी अनेकांना अद्याप न्याय मिळाला नसल्याचं विधान केलं.
आमच्या ४०आमदारांपैकीही इच्छुकांना न्याय मिळाला नाही,त्यामुळे बच्चू कडूंच…शिंदे गटातील मंत्र्यांच मोठं विधानं
- Advertisement -