लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करते आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेत तर चला आम्ही तुमच्याबरोबर येतो म्हटलं आहे.
साधारण आठ एक वर्षांपूर्वी मोदींनी बिहारच्या लोकांना सांगितलं होतं. ५० हजार कोटींमुळे बिहारचं काही होणार नाही असं मोदी म्हटलं होतं. असं करत करत सव्वा लाख कोटींचं पॅकेज मोदींनी जाहीर केलं होतं. या गोष्टीला आठ वर्षे झाली. आता नितीश कुमारांना विचारा की सव्वा लाख कोटी बिहारला मिळाले का? बिहारच्या जनतेला जर सव्वा लाख कोटी मिळाले असतील तर आम्हीही तुमच्याबरोबर येतो. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.