शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी एक मोठा दावा केला आहे. येत्या काळात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे गटाने जेवढी कागदपत्रे दिलेली आहेत. ती खोटी आहेत. कागदपत्रावर ज्या सह्या आहेत. त्या देखील खोट्या सह्या आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार पक्ष प्रमुखपद हे अस्तित्वातच नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.शिवसेना पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. आजपासून पुढील चार दिवस सलग सुनावणी होणार आहे.
आमदार अपात्रता सुनावणी…शिवसेनेच्या घटनेवरून ठाकरे गटाची अडचण वाढली..
- Advertisement -