सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती आहे. ठाकरे-फडणवीस यांच्यात 21 जून रोजी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंनी भाजप श्रेष्ठींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे., “21 जून आणि त्यानंतरही ठाकरेंनी फडणवीसांना दोन फोन केल्याची माहिती आहे. शिवसेनेचं सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन फडणवीसांना फोन केल्याची माहिती आहे. पक्षामध्ये विभाजन होण्यापेक्षा, आसाम गुवाहाटीला गेलेले आणि मुंबईत राहिलेले आमदार, असं विभाजन न होता, हे सर्व एकत्र राहून भाजपसोबत पुन्हा शिवसेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याचा अंदाज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.