काही उखाणे इतके भन्नाट असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीने उखाण्यातून व्यथा मांडली. हा व्हिडीओ एकदा पाहाच.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये दोघे नवरा नवरी स्टेजवर बसलेले असतात. नवरी उखाणा घेताना व्हिडीओत दिसत आहे. ती म्हणते, “कधीही फोन करा, फोन लागेल व्यस्त; किरणरावांच्या प्रेमात मी बुडाले जबरदस्त” नवरीचा हा उखाणा ऐकून नवरदेव थक्क झाला आणि हसायला लागला.