काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. मात्र, यावेळी या स्टंट करणाऱ्या तरुणांना चांगलाच चोप बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या दोन तरुणांवर संताप व्यक्त कराल.
रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात, तरीही काही लोक जाणीवपूर्वक आपला जीव धोक्यात घालतात. स्टंटबाजी करणारे हे तरुण अशावेळी स्वत: बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अनेकवेळा हे तरुण तावडीतून सुटतात, तर काहीवेळा पोलिसांच्या तावडीत सापडले तर चांगला मार खातात. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना रस्त्यावरील लोकांनी पकडलं आहे. यावेळी तिथे ट्रॅफिक पोलिसही दिसत आहेत. दरम्यान, एक व्यक्ती या दोन्ही तरुणांना हेल्मेटने मारहाण करताना दिसत आहे, तर पोलिसही तरुणाच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत.
https://x.com/gharkekalesh/status/1801188948431270220?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1801188948431270220%7Ctwgr%5Eb687b239d02a6f2b236a81fbdd937a30153646c0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Funcle-and-two-guys-on-road-over-they-were-doing-stunts-on-busy-road-video-goes-viral-on-social-media-srk-21-4426794%2F