केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन हे ५० हजारांवरुन ७५ हजार करण्यात आलं आहे. तसंच निर्मला सीतारमण यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.अर्थसंकल्पाच्या शेवटी त्यांनी कर प्रणाली जाहीर केली. ज्यानुसार ३ लाखापर्यंतच्या उत्पनावर कुठलाही कर लागणार नाही.
०-३ लाख- कुठला कर नाही
३-७ लाख – ५ टक्के
७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर
नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे १७५०० रुपये वाचणार आहेत.