उद्धव ठाकरेंसह त्यांच्या शिवसेनेवर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे. “एकनाथ शिंदे पाकिटं पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नाही,” या त्यांच्या विधानानं खळबळ उडाली आहे.केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला. राणे म्हणाले, “ज्यांनी पाकिटांची डिलिव्हरी केली त्यांनी शिंदेंवर बोलू नये. त्यावेळचे कुठे गेले खोके, कसे जात होते ते? वेळ कुठली असायची, कुणाच्या हातात दिले, कुठल्या माळ्यावर जायचे? मला सगळं माहिती आहे. पण त्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे रहायचे म्हणून मला त्यावर अधिक काही बोलायचं नाही.
एकनाथ शिंदे पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळं ठाकरेंनी खोके खोके बोलायचं सोडा निवडणुकीत तुमचं काहीही होणार नाही,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.