केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच ओळखले जातात. आता गडकरी यांनी वाशीममध्ये एका कार्यक्रमात धडाकेबाज भाषण करत एक किस्सा सांगितला आहे.
“मी गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री आहे. पण विमानतळावर मला घेण्यासाठी एक कुत्रंही येत नाही. मात्र, एक कुत्रा येतो. कारण मला झेड प्लस सिक्युरिटी आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत दोन पोलिसवाले असतात. पण पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार कुणीही येत नाही”, असं गडकरी म्हणाले. गेल्या ४५ वर्षांमध्ये मी कुणालाही खोटे आश्वासन दिले नाही. जे काम होतं ते मी स्पष्ट सांगतो. त्यामुळे काम का झालं नाही ? असे मला कुणीही विचारू शकत नाही. पण राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी पोस्टरदेखील लावणार नाही. बॅनरदेखील लावणार नाही, कुणाला चहापाणी करणार नाही, पण सेवा मात्र इमानदारीने करेल”, असं गडकरी म्हणाले.