नुकताच नितीन गडकरी यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो व्हिडीओ झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला. ‘गुप्तेंच्या खुपणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला येताहेत नितीन गडकरी,’ असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्ते काही नेत्यांचे फोटो दाखवून त्यांच्याबद्दलची खुपणारी गोष्टी नितीन गडकरींना विचारत आहे. यावेळी शरद पवारांचा फोटो दाखवला असताना गडकरींनी त्याच्याबद्दल खुपणारी गोष्ट सांगितली की, “पवारसाहेब कधीच स्पष्ट बोलतं नाहीत.” तसेच व्हिडीओत उद्धव ठाकरेंबद्दलही गडकरी खुपणार गोष्ट सांगताना दिसत आहेत.