विरोधकांनी कितीही टिका केली तरी आम्ही मजबूत आहोत. २०२४ ला सत्तेत आम्हीच येणार. कितीही विरोधक एकत्र आले तरिही नरेंद्र मोदी यांना हरवणे सोपं नाही. भारतीय संविधानात सर्व धर्माचा सन्मान आहे. संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात इतर धर्माचा अपमान नाही. नव्या संसद भवनाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं तर आनंद होईल, असे विधान केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय.
येणाऱ्या सर्व निवडणूकीत रिपब्लिकन पक्ष भाजप- सेनेसोबत राहिल. रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्या अशी मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला दोन ते तीन जागा हव्या आहेत. लोकसभेच्या दोन जागा निवडून आल्या तर आम्हाला राज्याची मान्यता मिळेल. दोन जागा निवडून याव्यात यासाठी शहा, फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. तर, विधानसभेला १५ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. संधी मिळाली तर शिर्डी येथून लोकसभा लढायची इच्छा आहे, आगामी निवडणूक आम्ही कमळ चिन्हावर नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढणार, असे ते म्हणाले.