Monday, April 22, 2024

भाजपला दे धक्का….विद्यमान खासदाराने बांधले ठाकरेंचे ‘शिवबंधन’

भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला माझ्या कामाची किंमत नाही, एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटात सामील होत असल्याचं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज होते. त्यामुळे नाराज उन्मेष पाटील यांनी मंगळवारी ठाकरे गटाचे नेत्यांची भेट घेतली. त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles