पुढील ४ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दिवाळीचा सण तोंडावर असताना ऐन थंडीत राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. राज्यावर अवकाळीचं संकट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे
पुढील ४ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी, अशाही सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
राज्यावर पुढील ४ दिवस अवकाळीचं संकट; अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- Advertisement -