Saturday, December 7, 2024

unseasonal rain :राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज

राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडणार असताना तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जात आहे. त्याचा परिणाम पावसावर होणार आहे. यामुळे ५ ते ८ एप्रिल दरम्यान उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांत पाऊस पडणार आहे. मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. शेतात काढून ठेवलेले रब्बी पीक वाया गेले होते. आता पुन्हा पावसाचे संकट आल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles