Thursday, July 25, 2024

त्यांना पाहिलं आणि मी घाबरून पळून गेलो….राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच अमेरिकेमधील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी राज ठाकरेंनी काही किस्सेही सांगितलं. या मुलाखतीत त्यांना तुम्ही नेमकं कुणाला घाबरता? असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लग्नापूर्वी मी आणि शर्मिला एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. त्यावेळी माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघ यांना शर्मिला आणि माझ्यातील प्रेमसंबंधाबाबत माहीत नव्हते. रात्री अडीच-तीनच्या दरम्यान, मी शर्मिला यांना सोडायला त्यांच्या घरी सोडायला गेलो. तेव्हा गेटजवळ कोणीतरी फिरताना दिसलं. तेव्हा तिने मला तिथं बाबा आहेत, असं सांगितल. ती 31 डिसेंबरची पहाट होती. त्यावर मी तिला सांगितलं की, बाबा नाहीत, तिथे वॉचमन आहे. पण ते शर्मिला यांचे बाबा होते, तेव्हा घाबरून तिथून पळ काढला, माझ्या आयुष्यातला हा एकमेव प्रसंग असा आहे, की मी पळून गेलो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles