गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. या गृहिणीने तांदळात बांगडी टाकली आणि कमालच झाली.
महिलेने सांगितल्यानुसार एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी टाका. यात एक बांगडी टाका. दुसरं भांडं घ्या. त्यानंतर तांदळाचं भांडं हलवून घ्या. बांगडी तांदळाच्या आत तळाशी जाईल. तांदूळ वर येतील. आता हातावर हळूहळू थोडे तांदूळ आणि पाणी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या. अशी प्रक्रिया हळूहळू शेवटपर्यंत करत राहा. आता शेवटी जे तांदूळ उरतील त्यात तुम्हाला दगड दिसतील. सर्व दगड भांड्याच्या तळाशी राहतात. बऱ्यादा तांदळात असे दगड असतात. त्यामुळे तांदूळ निवडावे लागतात. तरी एखाद दुसरा दगड तांदळात राहतो आणि मग भात खाताना तो तोंडात येतो.
पण या पद्धतीने तांदळात एकही दगड राहणार नाही. जिथं तांदूळ निवडून दगड काढायला वेळ जातो, तिथं या ट्रिकने काही वेळातच तांदळातील दगड काढता येतील.