बटाटा एका विशिष्ट पद्धतीने वापरल्यास तुमचं लाइट बिल कमी होईल. एका गृहिणीने या जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता तुम्हाला करायचं काय आहे. तर हा बटाटा तुम्हाला फ्रिजमध्ये वापरायचा आहे.
बटाटा कापून तो फ्रिजरमध्ये चोळून घ्या. यामुळे एरवी फ्रिजमध्ये साचत असलेला बर्फ साचणार नाही. दोन दिवसातून एकदा हा उपाय करा, असा सल्ला या महिलेने दिला आहे. यामुळे वीज बिल कमी होतं, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे.