Monday, December 4, 2023

उपवासात ‘हे’ पीठ देईल तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह…

नवरात्रीच्या किंवा इतर उपवासात लोक अनेक प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करतात. तुम्हाला उपवासात ऊर्जावान, उत्साही राहायचे असेल तर तुम्ही या यादीमध्ये चेस्टनट फ्लोअर म्हणजेच शिंगाड्याच्या पिठाचा समावेश करू शकता.शिंगाड्याच्या पिठापासून तुम्ही अनेक गोड आणि वेगळ्या चवीचे पदार्थ बनवून उपवासात खाऊ शकता.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर वॉटर चेस्टनट पिठाच्या फायद्यांविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती याचे अनेक फायदे सांगत आहे.

तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर कार्ब-युक्त अन्न स्त्रोताच्या जागी चेस्टनटचे पीठ वापरून पाहा. याचे सेवन केल्याने तुम्ही कमी कॅलरी वापराल आणि त्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वजन वाढण्याचे टेन्शन राहणार नाही.

3. वॉटर चेस्टनटच्या पिठात फेरुलिक ऍसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे काही कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अशा परिस्थितीत या सकस आणि पौष्टिक पीठाचा आहारात समावेश करून तुम्ही कर्करोगासारख्या घातक आजारापासून स्वतःचा बचाव करू शकता.
शिंगाड्याचे पिठ केसांना पूर्ण पोषण देते. हे सर्वसाधारणपणे तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे. कारण त्यात जस्त, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई सारखे काही आवश्यक पोषक घटक असतात, जे निरोगी केसांसाठी योगदान देऊ शकतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: