Sunday, July 14, 2024

साबणाचे तुकडे फेकून नका देवू…ही भन्नाट ट्रिक वापरा…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला साबणांच्या उरलेल्या तुकड्यांचा कसा उपयोग करायचा, याविषयी सांगताना दिसते.तुम्हाला साबणांचे उरलेले चार पाच तुकडे दिसत आहे. या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि एका पातेल्यात टाका. तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता. त्यानंतर एक कढई घ्या. त्यात पाणी टाका आणि हे पाणी गरम करा. गरम पाण्याने भरलेल्या कढईत साबणांचे तुकडे भरलेले पातेले ठेवा. याला डबल बॉयलिंग प्रक्रिया म्हणतात. त्यानंतर साबणांच्या तुकड्यांमध्ये थोडे थोडे पाणी टाका आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की साबण पूर्णपणे वितळेल. त्यानंतर युज अँड थ्रो चा एखादा ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये गरम साबणाचे मिश्रण टाका. त्यानंतर हा ग्लास रुम टेम्प्रेचरमध्ये ठेवा किंवा मिश्रण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवू शकता. त्यानंतर एक तासानंतर तुम्हाला दिसेल की या मिश्रणाचा एक साबण तयार झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles