Friday, June 14, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधी अधिक मताधिक्याने विजयी…

उत्तर प्रदेशात रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विजय झालेला आहे. राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा तब्बल २ लाख जास्त मताधिक्य राहुल गांधी यांना मिळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवघ्या दीड लाखांच्या फरकाने विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात शेवटपर्यंच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, काही फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेत अजय राय यांचा पराभव केला. मागच्या वेळी मोदींना मिळालेल्या निवडणुकीच्या विजयाची तुलना केली असता यावेळी पंतप्रधान मोदी यांचं मताधिक्य घटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles