उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील भाजपाचे उमेदवार विश्वदीप सिंह चांगलेच चर्चेत आले आहेत. विश्वदीप सिंह यांच्या वयाच्या वादावरुन उत्तर प्रदेशमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे.
विश्वदीप सिंह यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या वयाचा घोळ समोर आला आहे. विश्वदीप सिंह यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे वय ६० असल्याचे नमूद केले होते. मात्र, यानंतर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विश्वदीप सिंह यांनी त्यांचे वय ७५ वर्ष नमूद केले आहे. त्यामुळे २०१४ ची निवडणूक ते २०२४ ची निवडणूक यामध्ये १० वर्षांचे अंतर असताना विश्वदीप सिंह यांचे वय १५ वर्षांनी कसे वाढले? यासंदर्भात समाजवादी पार्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत.