महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्यात भाजप महायुतीला बहुमत मिळाले. यानंतर आता राज्यभरातील अनेकांकडून ईव्हीएम मशीनवर विरोधक आक्षेप घेत आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीकडून EVM हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी EVM हटाव या मोहिमेची स्वत: स्वाक्षरी करुन सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार येत्या 3 ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.https://x.com/Prksh_Ambedkar/status/1863851896634577210