Wednesday, February 28, 2024

कोणाशी बोलायचं? आधी राधाकृष्ण विखे पाटील आणि आता अशोक चव्हाण भाजपच्या बाजूने…

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला समावेश करून घेण्यासाठी काँग्रेसकडून चर्चेमध्ये अशोक चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता. आता तेच अशोक चव्हाण भाजपच्या मार्गावर गेल्याने वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला चिमटा काढत सवाल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली यांनी यांनी ट्विट करत काँग्रेसला सवाल केला आहे.

अंजली आंबेकर यांनी म्हटले आहे की, 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना व्हीबीएशी युतीच्या चर्चेसाठी नियुक्त केले होते. ते भाजपमध्ये गेले. 2024 च्या निवडणुकीसाठी, अशोक चव्हाण यांना केवळ आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेसनेच नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही नियुक्त केले होते. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रिय काँग्रेस, कोणाशी बोलावे? तुमचे नेमलेले नेते भाजपकडे झुकत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles