विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून अन्य पक्षांच्या एक पाऊल पुढे टाकले. पक्षाने यावेळीही उमेदवारांच्या नावासमोर त्यांची जात नमूद करून सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून युवा चेहरा विनय भांगे यांच्यावर डाव लावला आहे.
रावेर- शमिभा पाटील (लेवा पाटील), सिंदखेड राजा- सविता मुंडे (वंजारी), वाशीम- मेघा डोंगरे (बुद्धिस्ट), साकोली- डॉ. अविनाश नान्हे (ढिवर), नांदेड दक्षिण- फारुख अहमद (मुस्लिम), लोहा- शिवा नारंगळे (लिंगायत), औरंगाबाद पूर्व- विकास दांडगे (मराठा), शेवगाव- प्रा . किसन चव्हाण (पारधी-आदिवासी), खानापूर- संग्राम माने (वडार). सिंदखेड राजा मतदारसंघातून सविता मुंडे यांनी मागील वेळी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढविली होती.