अहमदनगर – जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय राष्ट्रवादी चे प्रकाश पोटे -सामाजिक कार्यकर्त्यांनी केली तोडफोड कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालया त धुडगूस घालून कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या.
विविध गावांमधील जलजीवन योजनेंतर्गत सुरु असणारे काम नियमानुसार नसल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. ते म्हणाले, एक दीड कोटीच्या योजना या असून केवळ एक दीड फुटावर पाईपलाईन टाकली आहे. आम्ही याना लाईव्ह पुरावे दिले आहेत.
तरी देखील जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झाली नाही. कार्यकारी अभियंता हे फोन उचलत नाहीत असा आरोप यावेळी प्रकाश पोटे यांनी केला. त्यांनी यावेळी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
पोटे यांनी जिल्हा परिषद सीईओंना देखील इशारा दिला असून लवकरात लवकर आम्ही सांगितलेल्या गावातील कामाची पाहणी केली नाही तर यानंतर त्यांचे कार्यालय फोडले जाईल असे त्याची म्हटले आहे.