‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. मार्च महिन्यात या कार्यक्रमाची संपूर्ण टीम ऑस्ट्रेलिया टूरवर गेली होती. परदेशातील प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचं मनोरंजन करण्यासाठी अनेकदा हास्यजत्रेतील कलाकार परदेश दौऱ्यावर जात असतात. याठिकाणी या सगळ्या कलाकारांनी मिळून धमाल केल्याचं अनेक व्हिडीओजमध्ये पाहायला मिळालं. सध्या वनिता खरात आणि पृथ्वीक प्रतापचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी वनिता खरात आणि पृथ्वीक प्रताप जबरदस्त डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हन हम ले जाएंगे’ या चित्रपटातील “प्यार दिलों का मेला है…” या लोकप्रिय गाण्यावर हास्यजत्रेतील विनोदवीरांची ही जोडी थिरकली आहे.