Tuesday, February 27, 2024

हमीभावापेक्षा कमी दर, हतबल शेतकऱ्याने कापूस पेटवला..Video

हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान, यावर आता व्यापाऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भाव मिळण्यासाठी आपलीही कुठलीही हरकत नसल्याचं पत्र लिहून घेतली जात आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

वडेट्टीवारांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली, त्यात त्यांनी लिहिलं की, वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील शेतकरी अमोल ठाकरे अधिक भाव मिळणार या आशेने उमरी येथील सीसीआयच्या केंद्रावर गेले. सकाळी १० वाजतापासून कापूस विक्रीसाठी प्रयत्न केले. पण, सात-बारावर पेरा नोंदणी नसल्याने त्यांचा कापूस घेण्यात आला नाही. खुल्या बाजारात विक्री केला तरी खर्च निघणेही कठीण आहे. रक्ताचे पाणी करूनही कापसाला भाव मिळत नाही म्हणून पोटच्या लेकराप्रमाणे जपून वाढविलेला, पिकविलेला कापूस क्षणात त्यांनी गाडीसह पेटवून दिला.वडेट्टीवार यांनी लिहिलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश दिले. पण, शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल अशी व्यवस्था उभारली नाही. कापसासाठी ७,२०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला. खुल्या बाजारात मात्र ६,५०० रुपयांचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा तब्बल ७०० रुपयांनी कमी. बरं हमी भाव मिळणार तरी कसा? कापूस पणन महासंघाचे केंद्र अजूनही उघडलेले नाहीत. सीसीआयने मोजकी केंद्रे उघडली. सुपर ग्रेडच्या कापसाला ६ हजार ९२० रुपयांचा दर दिल्याचा गाजावाजा केला. अधिक दराच्या आशेने शेतकरी सीसीआयच्या केंद्रावर गेले असता सात-बारा, पेरापत्रक, ऑनलाईन नोंदणीची अट टाकण्यात आळी. मग कापूस विकायचा तरी कुठे?, असा सवाल वडेट्टीवारांनी केला.https://x.com/VijayWadettiwar/status/1756265362729865667?s=20

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles