वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्यांना नव्यानं मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांच्याकडे अद्याप कुठल्याही जिल्हाचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये. तसेच चौथ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याच प्रयत्न असल्याची देखील चर्चा सुरू. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. महायुतीमधील अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला आतापर्यंत तरी मुहूर्त लागलेला नाहीये.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं…पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
- Advertisement -