मनसेच्या कार्यकर्त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मोबाईल संभाषणाची एक ऑडिओ क्लिपदेखील शेअर केली आहे. हे संभाषण मनसे कार्यकर्ता तसेच वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर यांच्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
मी पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो, तर असा कोणता गुन्हा केला की मनसेचे कार्यकर्ते माझा खून करण्यापर्यंत गेले? असं वसंत मोरे म्हणाले. तसेच याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी करत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले.