Monday, April 22, 2024

चांगले वातावरण असताना मला लोकसभा लढवू दिली नाही…पक्ष सोडल्यावर वसंत मोरे यांची खदखद बाहेर..

मनसेसाठी पुण्यामध्ये एवढं चांगलं वातावरण असतानाही मला लोकसभा निवडणूक लढवू दिली नाही, पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो पण काही लोकांनी चुकीचे अहवाल दिले असा आरोप करत वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आधीही मी वेळोवेळी राज साहेबांकडे याची तक्रार केली होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही असंही ते म्हणाले. मी या आधी एकनिष्ठतेचा कळस केला, आता राजीनामा देऊन परतीचे दोर स्वतः कापले असं सांगताना वसंत मोरे ढसाढसा रडल्याचं दिसून आलं.

ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण असूनही या ठिकाणी निवडणूक लढवू दिली नाही असा आरोप वसंत मोरे यांनी केला. 2012 ते 2017 या काळात पुणे मनपामध्ये मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, मी विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळीही मोठी ताकद असताना लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण केल्याचं ते म्हणाले. राज ठाकरे यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नसल्याचंही ते म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles