Vastu Tips वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी कुठे आणि कोणत्या दिशेला असाव्या याबाबत उपाय देण्यात आले आहेत. आपल्या घरातील अनेक गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. अनेक लोक हातातले घड्याळ हे झोपताना उशीखाली ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार असे करु नये. घड्याळ जर उशीखाली ठेवून झोपले तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. घडाळ्यातून बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचा आपल्या मेंदू आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. या लहरींमुळे संपूर्ण खोलीत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे तुमची मनःशांती बिघडते आणि तणाव निर्माण होतो.वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ गोल, चौकोनी, अंडाकृती असावे. यामुळे सकारात्मकता वाढते. त्यामुळे घड्याळ खरेदी करताना घड्याळाच्या आकाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घराच्या भिंतीवर पेंडुलमचे घड्याळ लावणे फायदेशीर ठरते.
Vastu Tips… घरात घड्याळ चुकीच्या ठिकाणी लावल्यास होतो नकारात्मक परिणाम…
- Advertisement -