कापूर आणि लवंग यांचा एकत्रित वापर केल्यास नशीब उघडतं, असं म्हटलं जातं.
उन्नावमधले ज्योतिषाचार्य पं. ऋषिकांत मिश्र शास्त्री यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे.
घरात सुख-समृद्धी येण्यासाठी शनिवारी किंवा रविवारी सायंकाळी पाच लवंगा, तीन कापूर वड्या आणि तीन मोठ्या वेलची हे घटक एकत्र करून जाळावेत. त्यातून ज्वाळा येऊ लागल्या, की ते घराच्या सर्व भागांतून फिरवावेत. ते पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची राख मुख्य दारापाशी पसरवावी. ही राख पाण्यात मिसळून त्या पाण्याचे हबके मुख्य दारावर मारू शकता. असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो.
आर्थिक स्थिती चांगली नसेल, तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या वाटीत लवंग आणि कापूर एकत्र घेऊन जाळावं. वास्तुशास्त्रानुसार, असं केल्यास घराचत पैशांची कमतरता भासत नाही. हा उपाय करण्यासाठी पाच कवड्या आणि पाच लवंगा घेऊन लाल रंगाच्या कापडात बांधून लक्ष्मीमातेच्या चरणांना लावून घरात पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. त्यामुळे लक्ष्मीमाता खूश होईल .