Sunday, July 21, 2024

राज्य सरकारकडून वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी, विहींपने फटकारले… हे कसले हिंदुत्ववादी सरकार…

राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने वक्फ बोर्डासाठी दहा कोटींचा निधी दिल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने भाजप – शिवसेनेच्या हिंदुत्ववादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. “राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून हिंदुत्वचा वारसा घेऊन चालणारे सरकार जर अशी कारवाई करणार असेल, तर त्यांना हिंदुत्वाचे वारसदार म्हणावं की नाही म्हणावं असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होत असल्याची तीव्र भावना विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केली.”

शासनात योजना कोण बनवतो. जो पक्ष सत्तेत असतो तोच योजना बनवतो, मग कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या वक्फ बोर्डाला पैसे देण्याची गरज काय? असा सवालही शेंडे यांनी विचारला आहे.” वक्फ बोर्डाची निर्मितीच बेकायदेशीर आहे.. काँग्रेस ने मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा धोरण अवलंबून मुस्लिमांना खुश करण्यासाठी वक्फ बोर्डाची स्थापना केली होती. आताही मुस्लिम तुष्टीकरण करण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हिंदू समाजाने कुठपर्यंत हे सर्व सहन करायचं असा सवाल विहिंपने केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles