बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घडामोडींची देशभरात चर्चा पाहायला मिळाली. काहीही झालं तरी पुन्हा भाजपासोबत कदापि जाणार नाही, असं ठामपणे म्हणणारे नितीश कुमार राजदची साथ सोडून भाजपाच्या पंगतीत जाऊन बसले. या आघाडीत मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार पुन्हा त्या आघाडीतही मुख्यमंत्री झाले आणि बिहारनं एका राजकीय भूकंपाचा अनुभव घेतला. यानंतर नितीश कुमार हे कोलांटउड्या घेण्यात तरबेज असल्याचं म्हणत त्यांना विरोधकांनी लक्ष्य केलं. पण नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यामुळे आपली शपथ पूर्ण झाली म्हणत बिहारमधील भाजपाचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी चक्क मुंडन करून शरयू नदीत आंघोळ केली आहे!
नितीश कुमार यांच्या जदयूची लालू यादव यांच्या राजदशी आघाडी असताना ते बिहारचे मुख्यमंत्री होते. तेव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे बिहारमधील प्रमुख नेते सम्राट चौधरी यांचा नितीश कुमार यांना तीव्र विरोध होता. तत्कालीन जदयू-राजद आघाडीवर सम्राट चौधरी परखडपणे टीका करताना पाहायला मिळत होते. याच संतप्त वातावरणात सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची शपथ घेतली होती.
https://x.com/samrat4bjp/status/1808353194583773427?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1808353194583773427%7Ctwgr%5E200cd00899a8fbaa812ce06b62f2f520648fdd89%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fbihar-deputy-cm-bjp-samrat-chaudhary-removes-his-turban-saying-vow-completed-nitish-kumar-stepped-down-as-cm-pmw-88-4461406%2F