Thursday, January 23, 2025

आमदार रोहित पवार यांच्या विजयी मिरवणुक, गुलालाची उधळण व पावसाचे आगमन

आमदार रोहित पवार यांच्या विजयी मिरवणुकीला वरूण राजाची हजेरी

गुलालाची उधळण व पावसाचे आगमन एकाच वेळी

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )

जामखेड – आमदार रोहित पवार यांच्या विजयाबद्दल जामखेड शहरात फटाक्यांच्या आतषबाजीने गुलालाची उधळण करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीच्या वेळी जामखेड शहरात जोरदार वरूण राजाची हजेरी झाली सर्व सामान्य जनतेच्या मते आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीसाठी वरूण राजाने हजेरी लावली अशी चर्चा आहे.

यावेळी जेसीबीच्या साहाय्याने आमदार रोहित पवार यांना हार घालण्यात आला. एकवीस जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. पाच वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरा पर्यंत सुरूच होती.

कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल कोठारी पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत उद्या दि 3 डिसेंबर 2024 रोजी भव्य विजयी रॅली काढण्यात येणार
आली होती.

विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार आ. रोहीत (दादा) पवार हे निवडुन आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. पाऊस व गुलालाची उधळण एकाच वेळी झाली

जामखेड शहरात कोठारी पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत भव्य दिव्य अशी विजयी रँलीचे आयोजन करण्यात आले होते. पाऊस व गुलालाची उधळण एकाच वेळी झाली यामुळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात होते. पाऊस चालू असतांना व लाईट गेलेली असतांना देखली कार्यकर्ते बेधुंद नाचत होती .गुलालाची उधळण व फटाक्याची अतिषबाजी एकच वादा रोहित दादा या घोषणांनी जामखेड दुमदुमून गेले .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles