Tuesday, February 18, 2025

Video :तरुणीचा डान्सला कुठेही तोड नाही! हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा डान्स …

सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुले, तरुण मंडळी आणि एवढचं काय तर वयोवृद्ध लोकंही आवडीने डान्स करताना दिसून येतात.अनेक जणांना बॉलीवूड गाण्यावरही डान्स करायला आवडते. अशात नव्वदच्या दशकातील गाणी आजही विशेष लोकप्रिय आहेत.सध्या असाच एक तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी माधुरी दीक्षित यांच्या एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील एक नामवंत अभिनेत्री आणि तितकीच सुंदर डान्सर सुद्धा आहे. त्यांचे अनेक हिट गाण्यांवर अनेक जण आजही सोशल मीडियावर रिल्स बनवत असतात. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ही तरुणी सुद्धा माधुरी दीक्षितची खूप मोठी चाहती असावी. ती हुबेहूब माधुरीसारखी नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून काही लोकांना माधुरीची आठवण येईल.
हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. हा कॉलेजचा कार्यक्रम असावा आणि ही तरुणी कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करत असावी, हे वाटते. ती माधुरी दीक्षित यांच्या “हमको आज कल है इंतजार” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला क्षणभरासाठी वाटेल की माधुरी दीक्षितच डान्स करत आहे. हुबेहूब माधुरी सारखा डान्स करणाऱ्या या तरुणीला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. माधुरीने या गाण्यात डो पोशाख परिधान केला आहे तो पोशाख तिने सुद्धा परिधान केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles