दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये चक्क कोरियन तरुणींनी नऊवारी साडी नेसून लावणी सादर केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मला लागली कुणाची उचकी..’ या गाण्यावर कोरियन तरुणींनी लावणी सादर केली आहे. या व्हिडीओची सुरुवात अदिती भागवतच्या दमदार अदाकारीने होते. त्यानंतर तीन कोरियन तरुणी लावणी नृत्य सादर करतात. सेऊलमधील एका ऐतिहासिक राजमहालात हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. कोरियन तरुणींना अप्रतिम लावणी सादर करताना पाहून नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Video ‘मला लागली कुणाची उचकी..’ कोरियन तरूणींची नऊवारी साडी नेसून भन्नाट लावणी
- Advertisement -