Tuesday, May 28, 2024

Video…नितीश कुमार पंतप्रधान मोदींसमोर म्हणाले, भाजपचे ४ हजार पेक्षा जास्त खासदार निवडून येतील…

पंतप्रधान नरेंद्र मोदीही पत्येक भाषणात अब की बार 400 पारचा नारा देत आहेत. समोर बसलेल्या नागरिकांनाही त्याची आठवण करून देत आहेत. पण त्यांचे मित्र असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा आकडा थेट चार हजारांवर नेऊन ठेवला.

पंतप्रधान मोदींची बिहारमधीलल नवादा येथे प्रचारसभा झाली. यावेळी नितीश कुमारही उपस्थित होते. बिहारमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत पहिल्यांदाच हे दोन नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. मोदींच्या आधीच नितीश कुमारांनी जवळपास 25 मिनिटे जोरदार भाषण दिले. यावेळी भाषणाचा शेवट करताना मात्र त्यांना एनडीएचा नारा आठवला नाही.

भाषणाच्या शेवटी बोलताना त्यांनी यावेळी भाजपचे चार हजारांहून अधिक खासदार निवडून येतील, असे सांगितले. तसेच समोर बसलेल्या मतदारांना एवढे खासदार निवडून देणार ना, असे आवाहनही केले. भाषण झाल्यानंतर ते मोदींशेजारी जाऊ बसले आणि त्यांचे पाय धरले. नितीश कुमारांचे हे भाषण सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

https://x.com/SalmanSoz/status/1776930166255821063

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles