सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील दृश्य पाहून सर्वच अवाक् होत आहे. नवरदेवाने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीने त्याच्या कानशिलात सटासट लगावल्या. त्यानंतर संतापलेली नवरी तिथून निघून गेली. नवरीचा हा जमदग्नीचा अवतार पाहून सर्वच थक्क झालं. वऱ्हाडींना तर काय बोलावे तेच कळत नव्हते. सर्वच शांत झाले. लग्न मंडपात काही काळ स्मशान शांतता पसरली होती.नवरीच्या संतापाचं कारणही तसंच होतं. नवरदेव दारू ढोसून आला होता. त्याने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीला दारुचा प्रचंड वास आला. त्यामुळे नवरी संतापली. तिचा पारा चढला. नवरदेवाला लग्नात शुद्धच राहिली नाही. त्यामुळे संतापलेल्या नवरीने थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावली.
Video वरमाला गळ्यात पडताच नवरीने नवरदेवाला धुतला…तडक गेली मंडपाबाहेर…
- Advertisement -