सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण डोक्यावर ब्रेडचा एक जड आणि भलामोठा ट्रे ठेवून सायकल चालवत आहे तेही भररस्त्यात वाहनांच्या रहदारीमध्ये. विशेष म्हणजे हा तरुण सायकलचे हँडल न पकडताच सायकल चालवत आहे. अशाप्रकारे सायकल चालवाताना तरुणांचा बॅलन्स म्हणजेच संतलून पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
हा व्हिडीओ bicyclefilmfestival नावाच्या अंकाउटवर पोस्ट केलेला आहे. जो शहरातील सायकल संस्कृतीसंबधीत व्हिडीओ शेअर करत असते. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”इजिप्तच्या काहीरायेथे सायकलद्वारे ब्रेड पोहचवणे”
video: गौतमी पाटीलची परदेशातही क्रेझ; भारतीय तरुणानं युकेमध्ये केला गौतमीच्या लावणीवर डान्स