तुमच्यापैकी अनेकांच्या घरी सुकलेले लिंबू असेल तर ते लिंबू फेकायचा विचार करत असाल तर आताच थांबवा. या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – सुरुवातीला या सुकलेल्या लिंबाच्या उभ्या फोडी कापा. या फोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका.त्यात तीन चमचे मीठ, एक चमचा बेकींग पावडर, दोन चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे डिटर्जंट पावडर टाका. हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करा आणि बारीक केलेली पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्या. ही पेस्ट तुम्ही कोणतेही भांडे घासताना वापरू शकता. अॅल्युमिनियम, पितळ, तांब्याचे भांडे तुम्ही या पेस्टनी घासू शकता. हलक्या हाताने घासले तरी तुमच्या भांड्यावरचा सर्व काळवटपणा निघून जाईल. तुम्ही ही पेस्ट एकापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू शकता आणि वापरू शकता. ही ट्रिक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
Video घरातील सुकलेले, खराब झालेल्या लिंबाचा असा करा वापर..फायदे पाहून व्हाल अवाक..
- Advertisement -