व्हिडीओमध्ये तुम्ही एका गाडीला U टर्न मारताना पाहू शकता. आता तुम्ही म्हणाल मग यात काय विषेश? पण जर तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तर तुमच्याही अंगावर शहारे येतील. कारण या ड्रायव्हरनं अक्षरश: शांतपणे जणू मृत्यूलाच चकवा दिला आहे. क लाल रंगाची गाडी रस्त्याच्या कडेवर उभी आहे. बरं, हा रस्ता सुद्धा साधासुधा नाही. हा रस्ता उंच अशा डोंगरावर आहे. थोडी जरी चूक झाली तरी ही गाडी कड्यावरून थेट खोल दरीत पडेल. पण लक्षवेधी बाब म्हणजे अशा अवस्थेतही ड्रायव्हर अत्यंत शांतपणे युटर्न मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुमच्याही अंगावर शहारे येतील.
https://x.com/mashedAvocado_/status/1726985124510892513?s=20