समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन सिंह आरामात फिरत आहे. तेवढ्यात समोरुन एक व्यक्ती हातात काठू पकडून येते. ते पाहून सिंह तेथून धूम ठोकतात. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लिहिलंय की, दारुड्याला पाहून सिंह घाबरुन पळाले.
व्हिडीओ wildanimalsshorts नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक कमेंट पहायला मिळाल्या. काहींनी म्हटलं हा दारुडा नसून त्यांचा टेककेअर आहे. तर काहींनी दारुड्या व्यक्तीला सिंह घाबरल्यामुळे खिल्ली उडवली.