मुंबईतील विरारमध्ये एका बार ॲण्ड रेस्टॉरंटबाहेर तीन मद्यपी महिलांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचत मद्यधुंद अवस्थेतील तीन महिलांनी महिला पोलीस आणि इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यातील एका महिलेने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश पकडून फाडला आणि त्यांना धक्काबुक्की करून शर्टची कॉलर पकडली, तसेच मनगट व कोपराला जोरात चावा घेतला. त्यातील दुसऱ्या मद्यपी महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे केस ओढले. भर रस्त्यात रात्रीच्या वेळी ही घटना घडली, या मद्यपी महिलांना आपण का वागतोय याचे कसेच भान नव्हते. यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेल्या रेस्टॉरंटमधील महिला सुरक्षा कर्मचाऱ्यालाही धक्काबुकी करून तिचा टी-शर्ट फाडला. यावेळी तिसऱ्या मद्यपी महिलेने धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात, खांद्यावर हल्ला केला आणि डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेतला.https://x.com/DESIKALESHH/status/1788485532043108862